Nitesh Rane : मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? ; नितेश राणेंचं विधान
Nitesh Rane Statement : नागपूर हिंसाचार प्रकरणानंतर आज मंत्री नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी मी मुख्यमंत्र्यांचा लाडका असल्याचं म्हंटलं आहे.
मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या मंत्र्यांमध्ये मी आहे. माझे मुख्यमंत्री मला काय बोलणार? त्याची चिंता तू करायची नाही. माझ्या तोंडी कोणी लागू नये, असा टोला मंत्री नितेश राणे यांनी लगावला आहे. नागपूरमध्ये काल झालेल्या हिंसाचार प्रकरणानंतर आज विधीमंडळात त्यावर वादंग पेटलं. त्यानंतर मंत्री नितेश राणे यांनी या संपूर्ण प्रकरणानंतर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राणेंना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर वक्तव्य करण्यावरून तंबी दिली असल्याच्या चर्चेवर प्रश्न विचारला, त्यावेळी त्यांनी मी मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या मंत्र्यांच्या यादीत आहे. त्यांचा मी लाडका आहे. ते मला काय बोलणार? ते मला काय बोलले की नाही याची काळजी तु करू नको. माझ्या तोंडी उगच कोणी लागू नका, मी तुमच्या खासगी गोष्टीत जातो का? असा उलट प्रश्न यावेळी केला.