Special Report | राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पण विखे पाटील यांच्या मनातले मुख्यमंत्री कोण?
VIDEO | राज्याचे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे पण विखे पाटील यांच्या मनात दुसरंच कुणीतरी? बघा स्पेशल रिपोर्ट
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आमच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या या वक्तव्यानंतर शिंदे यांच्या शिवसेनेनं सुद्धा प्रत्युत्तर दिल्याचे पाहायला मिळाले. आमच्या मनात देखील एकनाथ शिंदे हेच एकमेव मुख्यमंत्री असल्याचे शंभुराज देसाई यांनी म्हटलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे पण विखे पाटील यांच्या मनात दुसरंच कुणीतरी? देवेंद्र फडणवीस मनातले मुख्यमंत्री असल्याचे विखे पाटील यांनी म्हटलं आहे. तर विखेपाटील यांच्या वक्तव्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील जळजळीत टीका केल्याचे पाहायला मिळाले. विखे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात मंगळसूत्र घालावं, अशी प्रतिक्रिया राऊतांनी देत टीका केली. काही दिवसांपूर्वी आमरावतीचे आमदार रवी राणा यांनी देखील मनातले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचे म्हटले होते. तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री म्हणणं जड जात असल्याचं म्हटलं होतं. यानंतर आता विखे पाटील यांच्या मनात फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस असल्याचे त्यांनी म्हटले आहे. बघा स्पेशल रिपोर्ट