‘गरज, निकट लक्षात घेऊन निधीचं वाटप केलं जात’; शंभूराजे देसाई यांचे स्पष्टीकरण
आता शिंदे फडणवीस सरकारच्या एका वर्षानंतर झालेल्या दुसऱ्या मंत्रि मंडळ विस्तारात अजित पवार हे पुन्हा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री झाले आहेत. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांच्याकडून निधी वाटपामध्ये भेदभाव होत असल्याची ओरड होत आहे
मुंबई, 24 जुलै 2023 | मागील महाविकास आघाडी सरकारमध्ये अजित पवार अर्थमंत्री असताना ते निधी वाटपामध्ये भेदभाव करतात अशी टीका शिवसेना आमदरांनी केली होती. त्यानंतरच शिंदे गट फुटून बाहेर पडला होता आणि मविआचे सरकार पडलं होतं. त्यानंतर आता शिंदे फडणवीस सरकारच्या एका वर्षानंतर झालेल्या दुसऱ्या मंत्रि मंडळ विस्तारात अजित पवार हे पुन्हा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री झाले आहेत. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांच्याकडून निधी वाटपामध्ये भेदभाव होत असल्याची ओरड आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून होत आहे. यावरून काँग्रेस नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांनी निधी वाटपात अजित पवार यांना भेदभाव केल्याचा आरोप केला आहे. तर त्यांच्यानंतर आमदार सुभाष धोंटे यांनी देखील असाच आरोप केला आहे. यावरून राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी स्पष्टीकरण देताना, फडणवीस आणि शिंदेचं सरकार असताना निधी वाटपात दुजाभाव कधीही केलेला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना आम्हाला कमी निधी मिळत होता. पण आता तसं होत नाही. हा या गटाचा तो त्या गटाचा असा भेदभाव केला जात नाही. तर गरज आणि निकट लक्षात घेऊन निधीचं वाटप केलं जात असा खुलासा देसाई यांनी केलाय.