Maharashtra Politics : ‘रोज उठून सकाळी 8 चा भोंगा द्यायचं काम आम्हाला नाही’; राऊत यांच्यावर कोणी केलीय खरमरीत टीका
त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर देत टीका केली होती. तसेच शिवसेनेनं युती तोडली, असं पंतप्रधान म्हणत असतील, तर ते दिशाभूल करत आहेत. त्यांनी जुने रेकॉर्ड तपासून पाहावेत. तर २०१४ मध्ये युती तुटल्याची माहिती भाजपतर्फे एकनाथ खडसे यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून दिली होती असं स्पष्टीकरण दिलं होतं.
सातारा, 10 ऑगस्ट 2023 । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एनडीए’च्या खासदारांच्या बैठकीत भाजपने नाही तर शिवसेनेनं युती तोडली असा दावा केला होता. त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर देत टीका केली होती. तसेच शिवसेनेनं युती तोडली, असं पंतप्रधान म्हणत असतील, तर ते दिशाभूल करत आहेत. त्यांनी जुने रेकॉर्ड तपासून पाहावेत. तर २०१४ मध्ये युती तुटल्याची माहिती भाजपतर्फे एकनाथ खडसे यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून दिली होती असं स्पष्टीकरण दिलं होतं. त्यावरून शिंदे गटाचे नेते मंत्री शंभुराज देसाई यांनी राऊत यांच्यावर आगपाखड केलीय. राऊत हे काय बोलतात याला आम्ही उत्तर द्यायला मोकळं नाही. आम्हाला इतर काम आहे जनतेचे प्रश्न आहेत. रोज उठून आठचा भोंगा द्यायचं काम आमचं नाही. 2014 मध्ये एकनाथ खडसे यांनी उद्धव ठाकरेंना काय फोन केला हा इतिहास झाला. याविषयी नरेंद्र मोदी जे मनात आहेत की जी शिवसेना-भाजप युती ही शिवसेनेने तोडली आहे हे शंभर टक्के खरं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.