”आमदार संपर्कात आहेत की नाही हे त्यांना खासगीत विचारा उत्तर मिळेल”; शिवसेना मंत्र्याचा अजित पवार यांना टोला
मविआतील आमदार त्यांच्या संपर्कात आहेत या विधानावर निशाना साधला होता. अजित पवार यांनी, 25 ते 30 आमदार आमच्या संपर्कात आहेत. हेच 40 तिकडे जाऊन सत्ता स्थापन केली. म्हणून काय सगळेच आमदार त्यांच्यामागे जातील असं म्हटलं होतं.
पाठण (सातारा) : राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी यांनी सत्तेत असणाऱ्या मंत्री आणि भाजपसह शिंदे गटातील आमदारांचा समाचार घेतना टीका केली होती. तसेच त्यांनी मविआतील आमदार त्यांच्या संपर्कात आहेत या विधानावर निशाना साधला होता. अजित पवार यांनी, 25 ते 30 आमदार आमच्या संपर्कात आहेत. हेच 40 तिकडे जाऊन सत्ता स्थापन केली. म्हणून काय सगळेच आमदार त्यांच्यामागे जातील असं म्हटलं होतं. त्यावरून मंत्री शंभूराज देसाई यांनी अजित पवार यांना प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी देसाई यांनी, राज्यातील अनेक माविआतील आमदार हे भाजप आणि शिवसेनेच्या संपर्कात आहेत हे आजित पवारांना खाजगीत विचारा ते तुम्हाला सांगतील. तर हा दावा नाही तर ही वस्तुस्थिती आहे. महाविकास आघाडीतील अनेक आमदार आमच्या वेगवेगळ्या मंत्र्यांच्या संपर्कामध्ये आहेत. योग्य वेळी कोण संपर्कात आहेत त्यांच्या नावानिशी आम्ही सांगू असे ते म्हणाले.