हत्ती आणि बेडूकावरून भाजप-शिंदे गटात लागली; शंभूराज देसाई यांनी फटकारत प्रत्युत्तर दिलं, म्हणाले...

हत्ती आणि बेडूकावरून भाजप-शिंदे गटात लागली; शंभूराज देसाई यांनी फटकारत प्रत्युत्तर दिलं, म्हणाले…

| Updated on: Jun 14, 2023 | 2:09 PM

आता शिंदे गट आणि भाजपमध्ये मिठाचा खडा पडल्याचे दिसत आहे. याचदरम्यान भाजप खासदार अनिल बोंडे यांनी थेट आणि उघडपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी बेडूक किती फुकला तरी हत्ती बनत नाही, अशा शब्दात टीका केली आहे.

मुंबई : काल दिलेली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरहित शिंदे गटाची जाहिरात ही भाजपच्या जिव्हारी लागल्याचं दिसत आहे. काल आणि आजच्या या जाहिरातीवरून विरोधकांसह भाजपकडून आता शिंदे गटावर टीका होत आहे. यावरूनच आता शिंदे गट आणि भाजपमध्ये मिठाचा खडा पडल्याचे दिसत आहे. याचदरम्यान भाजप खासदार अनिल बोंडे यांनी थेट आणि उघडपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी बेडूक किती फुकला तरी हत्ती बनत नाही, अशा शब्दात टीका केली आहे. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटात मोठी ठिणगी पडल्याचं दिसून येत आहे. यावरून आता मंत्री शंभूराज देसाई यांनी बोंडे यांच्यावर खरमरीत टीका करताना, बेताल वक्तव्य कुणी करत असेल तर बरोबर नाही असं म्हटलं आहे. तर आम्ही बोलताना काळजी घेतो, भाजपनेही घ्यावी असं म्हणत अनिल बोंडे यांनी वादग्रस्त वक्तव्य टाळावीत असल्याचं म्हटलं आहे.

Published on: Jun 14, 2023 02:09 PM