सांगली जिल्ह्याच्या मिरजमध्ये जिल्ह्यातील 100 फूट उंच तिरंगा ध्वज
VIDEO | मिरजेत जिल्ह्यातील पहिला शंभर फूट उंच तिरंगा ध्वज आणि ततुवाद्य प्रतिकृतीचे कामगार मंत्री सुरेश खाडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण
सांगली, १५ ऑगस्ट २०२३ | देशभरात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र मंदिरं आणि १२ ज्योतिर्लिंग मंदिरात देखील स्वातंत्र्य दिनानिमित्त आकर्षक सजावट करण्यात आली आहे. तर १५ ऑगस्टचे औचित्य साधत आज सांगलीच्या मिरज मध्ये भव्य आणि जिल्ह्यातील पहिला शंभर फूट उंच तिरंगा ध्वज लोकार्पण सोहळा पार पडला. कामगार मंत्री सुरेश खाडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला आहे. सांगली महापालिकाचे माजी स्थायी समिती सभापती आणि नगरसेवक निरंजन आवटी यांच्या मार्गदर्शनाखाली मिरजेत जिल्ह्यातील पहिला शंभर फूट उंच तिरंगा ध्वज लोकार्पण सोहळा पार पडला. तसेच महात्मा गांधी पुतळा चौकामध्ये ततुवाद्य प्रतिकृतीचे उद्घाटन यावेळी करण्यात आले.
Published on: Aug 15, 2023 11:36 PM