Uday Samant : एकनाथ शिंदे हेच मोदीमय नाहीतर…, संजय राऊत यांच्या ‘त्या’ टीकेवर उदय सामंत काय म्हणाले?
VIDEO | भाजपवाल्यांपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेच जास्त मोदी-मोदी करतात, असे म्हणत संजय राऊत यांनी सडकून टीका, या टीकेवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काय फटकारलं? बघा व्हिडीओ
मुंबई, १६ ऑक्टोबर २०२३ | मोदीचं सरकार येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले होते. या वक्तव्यावरून उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी चांगलाच घणाघात केलाय. भाजपवाल्यांपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेच जास्त मोदी-मोदी करतात, असे म्हणत संजय राऊत यांनी सडकून टीका केली आहे. संजय राऊत यांच्या टीकेवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी उदय सामंत म्हणाले, केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेच मोदीमय नाहीतर संपूर्ण देशच मोदीमय झालेला आहे. तर खासदारकीच्या निवडणुकीच्या नंतर संपूर्ण भाजप आणि महायुतीचं सरकार येणार आहे. इतकंच नाहीतर २०२४ ला पंतप्रधान नरेंद्र मोदीच देशाचे पंतप्रधान होणार आहे, असा विश्वासही उदय सामंत यांनी व्यक्त केला.