सांगलीत 83 लाखांच्या फसवणूक प्रकरणी 4 अटक; काय आहे नेमकं प्रकरण?

सांगलीत 83 लाखांच्या फसवणूक प्रकरणी 4 अटक; काय आहे नेमकं प्रकरण?

| Updated on: May 21, 2023 | 2:23 PM

सांगली येथे तीन पुरूष आणि एका महिलेनं पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून तब्बल 83 लाखांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. त्यावरून सांगलीच्या आर्थिक गुन्हे शाखेने कारवाई करत चौघांना अटक करण्यात आली आहे.

सांगली : सध्या झटपट पैसा कमावण्याकडे अनेकांचा कल दिसत आहे. यातूनच अनेक गैरव्यवहार तर आर्थिक फसवणुकीचे प्रकार समोर येत आहेत. विशेष म्हणजे याप्रकरणांमध्ये महिलांचाही समावेश आहे. फसवमूक होणाऱ्या आणि फसवणूक करणाऱ्यांमध्ये महिलांचा समावेश असल्याने आता काय करायचं असाच सवाल सांगलीकर करत आहेत. सांगली येथे तीन पुरूष आणि एका महिलेनं पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून तब्बल 83 लाखांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. त्यावरून सांगलीच्या आर्थिक गुन्हे शाखेने कारवाई करत चौघांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या चौघांना दहा दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तर याबाबत माहिती अशी की, सांगली शहरातील रिचआधार मल्टी ट्रेडर्स ॲड डेव्हलपर्स एल. एल. पी. या कंपनीत आर्थिक गुंतवणूक केल्यास विशिष्ट कालावधीनंतर रक्कम दुप्पट करण्याचे आमिष दाखवले गेले. सांगलीसह सोलापूर येथील सहा गुंतवणूकदारांची तब्बल 83 लाख 48 हजार 500 रुपयांची फसवणूक केली गेली. याबाबत तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार रिचआधार कंपनीचा संचालक सतीश काका बंडगर, जयश्री सतीश बंडगर, संतोष काका बंडगर आणि अनिल मारुती आलदर (रा. सांगली ) यांना अटक करण्यात आली आहे.

Published on: May 21, 2023 02:23 PM