राहुल गांधी यांना खासदारकी मिळाल्यानंतर आदित्य ठाकरे यांचे ट्विट; ‘आम्ही लढत राहू!’
मोदी आडनावा प्रकरणी राहुल गांधी यांना गुजरात उच्च न्यायालयाने दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर त्यांच्या खासदारकीवर गदा आली होती. याप्रकरणी राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. ज्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी गुजरात उच्च न्यायालयाच्या शिक्षेला स्थगिती दिली.
मुंबई, 7 ऑगस्ट 2023 | काँग्रेस नेते राहुल गांधी यांना खासदारकी पर मिळाली आहे. मोदी आडनावा प्रकरणी राहुल गांधी यांना गुजरात उच्च न्यायालयाने दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर त्यांच्या खासदारकीवर गदा आली होती. याप्रकरणी राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. ज्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी गुजरात उच्च न्यायालयाच्या शिक्षेला स्थगिती दिली. त्यानंतर त्यांना आज खासदारकी बहाल करण्यात आली आहे. यानंतर ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत त्यांचे अभिनंदन केलं आहे. त्यांनी, अभिनंदन! न्यायाच्या मार्गाने पुन्हा एकदा लोकसभेत जाण्याचा तुमचा मार्ग मोकळा झाला. आपल्या देशासाठी आणि सत्यासाठी लढणाऱ्यांना गप्प करण्याच्या कारवाया सारं जग पाहत आहे. असल्या कृत्यांमुळे भारताची बदनामी होत असून आम्ही या दडपशाही विरोधात लढा देत राहू! आम्ही सत्य, लोकशाही आणि संविधानासाठी लढत राहू! असे म्हटलं आहे.