‘विरोधी पक्ष नेत्याच्या भूमिकेतच त्यांनी राहावं, दिल्लीचे एजंट...’; त्या दाव्यावर राष्ट्रवादीच्या आमदाराचा टोला

‘विरोधी पक्ष नेत्याच्या भूमिकेतच त्यांनी राहावं, दिल्लीचे एजंट…’; त्या दाव्यावर राष्ट्रवादीच्या आमदाराचा टोला

| Updated on: Aug 17, 2023 | 8:48 AM

काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीवरून गेल्या दोन दिवसांपासून दावे आणि मोठी वक्तव्य केली आहेत. ज्यामुळे त्यांच्यावर टीका होताना दिसत आहे.

मुंबई : 17 ऑगस्ट 2023 | अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीवरून सध्या राजकीय चर्चांना उधान आलं आहे. याभेटीवरून काँग्रेस आणि ठाकरे गटात नाराजी दिसून येत आहे. तर काँग्रेसचे नेते याबाबत उघड उघड बोलत आहेत. तर यावरूनच काँग्रेसचे नेते विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील टीका केली आहे. तर आता त्यावरून मोठा दावा देखिल केला आहे. शरद पवार हे सोबत आले तरच तुम्हाला मुख्यमंत्री करू असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवार यांनी म्हटल्याचा दावा वडेट्टीवार यांनी केला. त्यावरून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं होतं. तर असे बोलणं हे हे हास्यास्पद असल्याची टीका देखील त्यांनी केली होती. आव्हाड यांच्या या टीकेनंतर आता याचमुद्द्यावरून अजित पवार गटाचे नेते आमदार अमोल मिटकरी यांनी देखील वडेट्टीवार यांच्यावर निशाना साधला आहे. वड्डेटीवार यांचे दिल्लीत भाजपा सोबत इतके संपर्क आहे की वड्डेटीवार विरोधी पक्ष नेते आहेत की एजंट हे समजत नाही अशी टीका मिटकरी यांनी केली आहे. याचबरोबर आणखीन त्यांनी काय म्हटलं आहे, ते पाहा या व्हिडीओत…

Published on: Aug 17, 2023 08:48 AM