‘त्यांची सुरक्षा कमी केल्यानेच ते असे आरोप करत आहेत’; राऊत यांच्यावर कोणाची टीका
यावेळी त्यांनी मोठ्या गुन्हेगारांना आगामी निवडणुकांच्या आधी तुरुंगात बाहेर काढण्याचं षडयंत्र मुख्यमंत्री कार्यालयातून रचण्यात येत आहे असा आरोप केला आहे. तसेच याबाबत पुरावे आपण लवकरच देवू असे त्यांनी म्हणताना, हे षडयंत्र कोणाविरोधात आहे, याची माहितीही आपल्याकडे असल्याची त्यांनी म्हटलं आहे.
मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुख्यमंत्री कार्यालयावर गंभीर आरोप केले. यावेळी त्यांनी मोठ्या गुन्हेगारांना आगामी निवडणुकांच्या आधी तुरुंगात बाहेर काढण्याचं षडयंत्र मुख्यमंत्री कार्यालयातून रचण्यात येत आहे असा आरोप केला आहे. तसेच याबाबत पुरावे आपण लवकरच देवू असे त्यांनी म्हणताना, हे षडयंत्र कोणाविरोधात आहे, याची माहितीही आपल्याकडे असल्याची त्यांनी म्हटलं आहे. यावरून शिंदे गटाचे आमदार तथा प्रवक्ते संजय शिरसाट यांनी राऊत यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. यावेळी शिरसाट यांनी, राऊत हे वर्षा बंगल्यावरचे ऑपरेटर आहेत का असा सवला करत पलटवार केला आहे. तर राऊत हे नवनवे आरोप करत असतात. तर आरोप करण्यामागे यांची सुरक्षा कमी करणं हे कारण आहे. यामुळे ते सध्या निराश आहेत असा टोला शिरसाट यांनी लगावला आहे.