‘मी कॅबिनेट मंत्री नसल्यामुळे बोलवलं नसेल’; बच्चू कडू यांचे डिनर आमंत्रणावरून मोठं वक्तव्य
राज्याचे मुख्यमंत्री एकाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षातील आमदारांची नाराजी दूर करण्याचे ठरवले होते. तर त्यांच्याकडून त्यांचे आमदार आणि मंत्र्यांना एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भोजन देण्यात येणार होते. त्यामुळे शिंदे यांच्या डिनर डिप्लोमसीची चर्चा रंगली होती. पण आता यात ट्विस्ट आला आहे.
ठाणे : 17 ऑगस्ट 2023 | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या आमदार आणि मत्र्यांची नाराजी दूर करण्यासाठी डिनर डिप्लोमसी आखली होती. तर त्यांच्याकडून नाराजांना एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हे भोजन देण्यात येणार आहे. तर त्याची आमंत्रण आता शिंदे गटाचे आमदार आणि मंत्र्याने जात आहेत. मात्र त्याचे आमंत्रण प्रहार’चे आमदार बच्चू कडू यांना देण्यात आलेले नाही. यावरून त्यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. यावेळी त्यांनी, निमंत्रण आलेलं नाही. पण त्याची काही आवश्यकता नाही. तर आपल्या तसं निमंत्रण यावं असं वाटतंही नाही. तर हे निमंत्रण फक्त कॅबिनेट मंत्र्यांनाच आहे. तर मी काही कॅबिनेट मंत्री नाही. त्यामुळे कदाचित बोलवलं नसेल. तर तुम्हालाही कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा आहे मग? यावर कडू यांनी, दर्जा असणं आणि कॅबिनेट मंत्री असणं यात फरक आहे अशी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.