‘विरोधी पक्ष नेता कधी सत्तेत जाऊन बसेल हे कधी सांगता येत नाही’; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
त्यांनी दूधावरून सरकारला घेरलं होतं. त्यानंतर आता थेट त्यांनी सरकारविरोधात दंड थोपाटले आहेत. ९ ऑगस्ट क्रांती दिनी अमरावती विभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्याची घोषणाच बच्चू कडू यांनी केली आहे.
अमरावती, 06 ऑगस्ट 2013 | प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांनी पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सरकारवर घणाघात केला होता. त्यांनी दूधावरून सरकारला घेरलं होतं. त्यानंतर आता थेट त्यांनी सरकारविरोधात दंड थोपाटले आहेत. ९ ऑगस्ट क्रांती दिनी अमरावती विभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्याची घोषणाच बच्चू कडू यांनी केली आहे. यावेळी शेतकरी, वंचित, कामगार आदी मुद्द्यावर महाराष्ट्रातील लोक आता मला एकत्र करायचे आहे. ज्याचा कोणी नाही त्याचा आवाज होण्याचं काम आम्ही करत आहे असे त्यांनी म्हटलं आहे. तर सत्तेत असणाऱ्या माणसाने भजन करायची असतात का? असा सवाल करत विधानभवनावर आंदोलन करण्याची वेळ आली तर ते पण करू असा इशाराही त्यांनी दिला आहे. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही वेळ आणू देणार नाहीत असा विश्वास ही असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर विरोधी पक्षातलं कोण कधी जाईल हे सांगता येत नाही अशी खोटक टीका केली आहे. तर आजचा विरोधी पक्ष नेता कधी सत्तेत जाऊन बसेल हे ही कधी सांगता येत नाही असं मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे राज्यात सध्या चर्चा होताना दिसत आहे.