2024 elections : बच्चू कडू यांचा आगामी 2024 निवडणुकीवरून मोठा दावा; ‘प्रहारचे 10-11 आमदार निवडणून येतील’
राज्यात काहीच महिन्यांवर लोकसभा आणि महापालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यावरून सगळेच पक्ष आणि राजकीय संघटना या मोर्चे बांधणीला लागले आहेत. त्याचदरम्यान प्रहार संघटेनेचे नेते आमदार बच्चू कडू यांनी मोठा दावा केला आहे.
सातारा : 24 ऑगस्ट 2023 | येत्या काही महिन्यात राज्यात लोकसभा आणि विधान सभांच्या रणधुमाळीला सुरूवात होण्याची शक्यता आहे. त्यानुसार प्रत्येक पक्ष हा मतदारसंघनिहाय आढावा घेत आहे. तर सभा आणि बैठांवर जोर देत आहे. याचदरम्यान प्रहार संघटनेचे नेते अपक्ष आमदार बच्चू कडू यांनीही मोठा दावा केला आहे. ज्यामुळे शिवसेना-भाजप-पवार यांच्या सत्तेतील युतीत खळबळ उडालेली आहे.
2024 निवडणुकीवरून दावा
आमदार बच्चू कडू यांनी साताऱ्यात आगामी 2024 निवडणुकीवरून दावा करताना प्रहारचे 10-11 आमदार हे निवडणूक येतील असा दावा केला आहे. तसेच त्यांनी आगामी 2024 निवडणुकीत आपण युतीकडे जागा देखील वाढवून मागणार असल्याचे संकेत त्यांनी यावेळी दिले आहेत.
15 जागांची मागणी
विधानसभा निवडणुका लागण्याच्या आधी जागा वाटपाबाबत अजुनही कोणताच फार्म्युला ठरलेला नाही. मात्र याच्या आधी कडू यांनी आपण युतीकडे 15 जागांची मागणी करणार असल्याचे म्हटलं आहे. तर सध्या युतीत शिंदे गट-भाजप आणि पवार गट असताना तेवढ्या जागा मिळणार का या प्रश्नावर त्यांनी तो अभ्यास त्यांनी करावा. ते माझे काम नाही, असं थेट उत्तर दिल्याने युतीत नक्की आता काय होणार असा सवाल उपस्थित होत आहे.