सर्व्हर डाऊन? परीक्षा केंद्रावर गोंधळ? बच्चू कडू भडकलेच, केली थेट मुख्यमंत्र्यांकडे ‘ही’ मागणी
राज्यातील बहुतांश परीक्षा केंद्रावर तलाठी भरती परीक्षे वेळी मोठी गोंधळ पाहायला मिळला. तर येथे तांत्रिक अडचण आल्याने त्याचा फटका हजारो उमेदवारांना बसला आहे. तर
अमरावती : 21 ऑगस्ट 2023 | राज्यभरातील विविध परीक्षा केंद्रांवर आज पासून तलाठी भरती परीक्षा सुरु झाली. तर अनेक परिक्षार्थींचे भवितव्य हे याच परिक्षवर अवलंबून असल्याने विद्यार्थ्यांनी देखील केंद्राच्या बाहेर गर्दी केली होती. मात्र परिक्षा सुरू होण्याच्या आधीच अनेक परिक्षा केंद्रावर सर्व्हर डाऊनची तांत्रिक अडचण आल्याने सकाळी सुरू होणारा पेपर दुपारी देखील झाला नाही. त्यावरू आता राजकीय वातावरण तापलेलं असून राजकीय नेते टीका करत आहेत. याच परिक्षेवरून आमदार बच्चू कडू यांची संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी कडू यांनी 30 तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार. तर या गोंधळाबाबत त्यांना भेटून माहिती देणार असे त्यांनी म्हटलं आहे. तर गोंधळ करणाऱ्या कंपनीवर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी करणार असून केरळच्या धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत परिक्षा घेण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. तर कोणत्याही परीक्षासाठी वर्षाकाठी फक्त 1000 रुपये परीक्षा फी आकारण्यात यावी अशी देखील मागणी कडू यांनी केली आहे.