आम्ही जनतेसोबत गद्दारी केली नाही : बच्चू कडू
माझा स्वतःचा पक्ष आहे. आम्हाला शिवसेने वाल्यांनी निवडून दिलं नाही. आम्हाला भाजपने निवडूण दिलं नाही की काँग्रेसवाल्यांनी. आम्हाला सामान्य माणसान निवडून दिलं
मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांची सध्याची अवस्था दयनीय झाली आहे. शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने राज्यातील नाशिक, अहमदनगर, जळगाव अशा अनेक भागातील शेतकऱ्यांनी उभा पिकावर आता नांगर फिरवला आहे. त्यानंतर आता जनसामान्यांचा, शेतकऱ्यांचा नेता म्हणून ओळख असलेल्या आमदार बच्चू कडू यांना नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यामधील नैताळे येथील शेतकऱ्याची भेट घेतली. त्याचवेळी शेतकऱ्यांनी, “भाऊ, तुम्ही शेतकऱ्यांचे कैवारी आहात मात्र या गद्दारांबरोबर तुम्ही जायला नको होत” आपल्या मनातील भावना बोलून दाखवल्या. त्यावर कडू यांनी, आम्ही सामान्य माणसासोबत गद्दारी केली नाही. पक्षाच्या नेत्यासोबत गद्दारी करू आणि आम्ही काही गद्दार नाही. माझा स्वतःचा पक्ष आहे. आम्हाला शिवसेने वाल्यांनी निवडून दिलं नाही. आम्हाला भाजपने निवडूण दिलं नाही की काँग्रेसवाल्यांनी. आम्हाला सामान्य माणसान निवडून दिलं. त्यामुळे बच्चू कडूची गद्दारी पक्षांसोबत होऊ शकते सामान्य माणसासोबत होऊ शकत नाही.