‘अजून किती लोक ढिगाऱ्याखाली सापडलेत याची कल्पना नाही’; गोगावले यांची प्रतिक्रिया

‘अजून किती लोक ढिगाऱ्याखाली सापडलेत याची कल्पना नाही’; गोगावले यांची प्रतिक्रिया

| Updated on: Jul 20, 2023 | 1:16 PM

यावरून शिंदे गटाचे नेते आमदार भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी यावेळी वस्तुस्तिती आहे आहे. जे घडलं आहे, ती अत्यंत वाईट आणि दुर्दैवी घटना घडली आहे.

रायगड, 20 जुलै 2023 | रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीवर दरड कोसळल्याने राज्यात दुखाचे वातावरण आहे. यावरून पावसाळी अधिवेशानात देखील जोरदार चर्चा झाल्याची पहायला मिळत आहे. यावरून शिंदे गटाचे नेते आमदार भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी यावेळी वस्तुस्तिती आहे आहे. जे घडलं आहे, ती अत्यंत वाईट आणि दुर्दैवी घटना घडली आहे. रात्री झोपेमध्येच काळानं त्यांच्यावर झडप घातली आहे. जे सुदैवाने बचावलेत ते बचावलेत. तर अजून किती लोक ढिगाऱ्याखाली सापडलेत याची कल्पना नाही. तर हे ठिकाण उंचावर आणि जाण्यासाठी मार्ग नसल्याने बचावकार्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे मान्युअलीच काम करावं लागत आहे. तर उपाययोजना करण्यावर कोणतचं दुमत नाही. पण हे लोक पिढ्यानं पिढ्या तेथे राहत असल्यानं ते जागा सोडत नाहीत. त्यामुळे सरकारचा यात काय दोष आहे. सरकारकडून सांगण्यात येतं त्यावेळी त्यांच्याकडून काय होईल ते होईल असं बोललं जातं आणि मग असे दुर्दैवी प्रकार घडतात. तर तेथे दरड कोसळलं असं कधी वाटलं ही नव्हतं. तर मंत्री आदिती तटकरे तेथे आहेत तुम्ही पाहणी करायला जाणार का या प्रश्नावर मी जाण्यापेक्षी तेथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री उदय सामंत, मंत्री गिरीष महाजन, मंत्री दादा भुसे आहेत. त्यामुळे तेथे काही अडचणीचा भाग नाही.

Published on: Jul 20, 2023 01:16 PM