कोट शिवून तयार, पण मंत्रिपदाची संधी कधी? भरत गोगावले यांचं थेट महादेवालाच साकडं, म्हणाले…

| Updated on: Dec 05, 2023 | 10:55 AM

३० जून २०२२ ला एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. शिंदे गटातील अनेक जण मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. सत्ता स्थापनेनंतर दीड महिन्यांनंतर शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार पण गोगावले यांनी मंत्रीपद नाही

Follow us on

मुंबई, ५ डिसेंबर २०२३ : मंत्रिपदासाठी आमदार भरत गोगावले कोट शिवून तयार आहेत. मात्र अद्याप त्यांच्या वाटेला मंत्रिपद आणि पालकमंत्री पद आलेलं नाही. आता भरत गोगवाले यांनी थेट महादेवालाच साकडं घातलंय. शिवसेनेचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी पुन्हा एकदा मंत्रिपदाची इच्छा बोलून दाखवली. मंत्रिपदासाठी भरत गोगावले यांनी पांडुरंगानंतर महादेवाकडे साकडं घातलंय. इतकंच नाहीत भरत गोगावले यांनी आपल्या कार्यकर्त्यांनाही महादेवाकडे प्रार्थना करण्याची विनंती केली. ३० जून २०२२ ला एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. शिंदे गटातील अनेक जण मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. सत्ता स्थापनेनंतर दीड महिन्यांनंतर शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला. पण गोगावले यांनी मंत्रिपद मिळालं नव्हतं. त्यावेळी देखील त्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली होती. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट