राज्यपाल यांनी केलेल्या वक्तव्यावरून लक्ष हटवण्यासाठी अजित पवार यांच्यावर टीका
अजित पवार यांचा हा विषय इतका घेण्यासारखा नव्हता पण फक्त राज्यातील जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी आणि त्यांच्या नेत्यांनी केलेल्या वक्तव्यावरून लक्ष बाजूला करण्यासाठी हे सगळ आरोप अजित पवार यांच्यावर करण्यात आले
पुणे : विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर केलेल्या वादग्रस्त विधानानंतर अनेक टीका झाल्या. त्यानंतर त्यांनी आपली बाजू मांडली. तसेच कोणाला काय म्हणायचं आहे ते म्हणा पण आपण छत्रपती संभाजी महाराज यांना स्वराज्य रक्षकच म्हणणार असे त्यांनी सांगितलं. तर झालेल्या या गदारोळावर राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार दत्तात्रय भरणे यांनी आपली प्रतिक्रीया दिली
यावेळी दत्तात्रय भरणे यांनी वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी अजित पवारांवर टीका भाजने केल्यावरून हे फक्त त्यांच्या लोकांनी केलेल्या वक्त्यावरून लक्ष हटविण्यासाठी केल्याचं म्हटलं आहे.
तर अजित पवार यांचा हा विषय इतका घेण्यासारखा नव्हता पण फक्त राज्यातील जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी आणि त्यांच्या नेत्यांनी केलेल्या वक्तव्यावरून लक्ष बाजूला करण्यासाठी हे सगळ आरोप अजित पवार यांच्यावर करण्यात आले. आणि त्यांवर काल अजित पवार यांना भूमिका स्पष्ट केल्याचेही भरणे यांनी म्हटलं आहे.