अजित पवारांचा फोन आला होता का?; ‘या’ आमदाराने स्पष्टच सांगितलं…
Dilip Mohite Patil On Ajit Pawar BJP : अजित पवारांनी बैठक बोलावली? 'या' आमदाराने स्पष्टपणे सांगितलं...
मुंबई : अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांवर आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आम्ही या सर्व गोष्टीपासून अनभिज्ञ आहोत. मला कोणत्याही नेत्याचा फोन आला नाही. ना अजित पवार यांचा फोन आला. या सर्व गोष्टी माध्यमातून ऐकतोय की, अजित पवार भाजपसोबत जाणार आहेत. दादांनीही याबाबत खुलासा केला आहे. आता पुन्हा चर्चा झाली की अजित पवारांनी 40 आमदारांच्या सह्या घेवून सादर केल्या. आम्ही सर्व आमदार हे अजित पवार यांच्या जवळचे आहोत. पवारसाहेबांना आम्ही भेटलो मात्र त्यांनी कोणतंही सूतोवाच केलं नाही. कोणत्याही आमदारांनी सह्या केलेल्या नाहीत”, असं दिलीप मोहिते यांनी म्हटलं आहे. कोणीही कुठं गेलेले नाही आणि अजित पवार यांनी कोणाला बोलावलं नसल्याचं स्पष्टीकरण आमदार दिलीप मोहिते यांनी दिलं आहे.
Published on: Apr 18, 2023 11:45 AM
Latest Videos