‘काय खोटारडा माणूस आहे’; ‘त्या’ वक्तव्याची आठवण करून देत फडणवीस यांच्यावर कुणी केली घणाघाती टीका

‘काय खोटारडा माणूस आहे’; ‘त्या’ वक्तव्याची आठवण करून देत फडणवीस यांच्यावर कुणी केली घणाघाती टीका

| Updated on: Aug 24, 2023 | 10:19 AM

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या मी पुन्हा येईन या वक्तव्यामुळे चांगलेच चर्चेत राहिले आहेत. त्याचबरोबर ते मी, अविवाहित राहणं पसंत करेन मात्र राष्ट्रवादीशी युती करणार नाही. नाही...नाही... नाही असे ही म्हणाले होते. पण त्यांनी अजित पवार यांनाच आपल्या सोबत घेतलं आहे.

जळगाव : 24 ऑगस्ट 2023 | राज्यातील सत्ता समिकरण अजित पवार आणि त्यांच्या गटामुळे बदलली आहेत. अजित पवार यांनी सत्तेत सहभागी होत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तेव्हापासून भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका होताना दिसत आहे. त्यांच्या एका वक्तव्यावरून त्यांच्यावर सतत टीका केली जातेय. फडणवीस यांनी एका मुलाखती वेळी, मी एक वेळ लग्न न करणे, अविवाहित राहणं पसंत करेन. मात्र राष्ट्रवादीशी युती करणार नाही. नाही…नाही… नाही असं सांगितलं होतं. त्यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत आमदार एकनाथ खडसे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडाडून टीका केली. यावेळी त्यांनी, फडणवीस यांच्या त्या वक्तव्याची आठवण करून देत टीका केली. फडणवीस म्हणत होते. नाही नाही नाही. मात्र आता काय झालं? त्यांनी राष्ट्रवादीशी युती केली. काय खोटारडा माणूस आहे हा? असं म्हणत खडसे यांनी फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

Published on: Aug 24, 2023 10:19 AM