‘शेतकऱ्याच्या मनामध्ये वारंवार आत्महत्येचे विषयी येत आहेत, मात्र...’; राष्ट्रवादीच्या नेत्याची सरकारवर निशाना

‘शेतकऱ्याच्या मनामध्ये वारंवार आत्महत्येचे विषयी येत आहेत, मात्र…’; राष्ट्रवादीच्या नेत्याची सरकारवर निशाना

| Updated on: Jul 24, 2023 | 8:26 AM

शेती मालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी हो मेटाकूटीला आला आहे. तर राज्यातील अनेक भागात शेतकऱ्याने आत्महत्या केल्या आहेत. त्यावरून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

मुक्ताईनगर/जळगाव, 24 जुलै 2023 | मागील काही वर्षापासून शेती मालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी हो मेटाकूटीला आला आहे. तर राज्यातील अनेक भागात शेतकऱ्याने आत्महत्या केल्या आहेत. त्यावरून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्याचबरोबर आपण शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर महाराष्ट्राच्या सभागृहामध्ये सरकारचं लक्ष वेधल्याचे त्यांनी सांगितलं आहे. यावेळी खडसे यांनी, गेल्या वर्षभराचं चित्र पाहिलं तर शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये मोठी वाढ झालेली आहे. गारपीट आणि वादळामुळे शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, वारंवार घोषणा करून सुद्धा शेतकऱ्यांना सरकारकडून अजूनही अनुदान मिळालेले नाही. पंचनामे काही ठिकाणी होतात परंतु प्रत्यक्ष लाभ मिळत नाही अशी काही ठिकाणची स्थिती आहे. शेतीमालाला भाव नाही, अशा स्थितीत शेतकऱ्याला मदत करायला सरकार पुढे येत नाही असा दावा देखील खडसे यांनी केला आहे. याचवेळी त्यांनी, शेतकरी नाराज असून त्याच्या मनामध्ये वारंवार आत्महत्येचे विषयी येत असल्याचे देखील खडसे म्हणालेत. तर संभाजीनगरचे आयुक्त यांनी घोषित केलेले आहे की मराठवाड्यातील एक लाख शेतकरी आत्महत्येचा विचार करत असल्याचे देखील त्यांनी म्हटलं आहे.

Published on: Jul 24, 2023 08:26 AM