Gopichand Padalkar | ‘मविआला पराभव समोर दिसत असल्यानं रडीचा डाव खेळत आहेत’-tv9
आमदार मुक्ता टिळक आणि आमदार लक्ष्मण जगताप यांनी लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी रूग्णालयात असतानाही येथे पर्यंत येऊन मतदान केलं. त्यामुळे त्यांच्याकडून आपल्याला शिकायला हवं असेही पडळकर यांनी म्हटलं आहे.
नवी मुंबई : विधानपरिषदेच्या निवडणूकीत (Legislative Council Election) आरोप प्रत्यारोपाच्या फौरीनंतर आज मतदान पार पडले. यावेळी पुन्हा जसे राज्यसभेच्या निवडणूकीत झाले तसाच कित्ता याही निवडणूकीत पहायला मिळत आहे. याच्या आधी जे भाजपने केलं ते आता काँग्रेसने केलं आहे. विधानपरिषदेच्या या निवडणूकीत काँग्रेसकडून भाजपचे आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मतावर आक्षेप घेण्यात आला. त्यावर आता भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (MLA Gopichand Padalkar) यांनी आपली प्रतिक्रीया देताना मविआला पराभव समोर दिसत असल्यानं रडीचा डाव खेळत आहेत असं म्हटलं आहे. तसेच आमदार मुक्ता टिळक आणि आमदार लक्ष्मण जगताप यांनी लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी रूग्णालयात असतानाही येथे पर्यंत येऊन मतदान केलं. त्यामुळे त्यांच्याकडून आपल्याला शिकायला हवं असेही पडळकर यांनी म्हटलं आहे.