मोबाईल गेम धर्मांतर प्रकरणी मुंब्रा कनेक्शन समोर येताच जितेंद्र आव्हाड आक्रमक; म्हणाले, ‘मुंब्रा बंद करू’

मोबाईल गेम धर्मांतर प्रकरणी मुंब्रा कनेक्शन समोर येताच जितेंद्र आव्हाड आक्रमक; म्हणाले, ‘मुंब्रा बंद करू’

| Updated on: Jun 12, 2023 | 9:00 AM

मुंब्र्यातील आरोपी शाहनवाज खान याने फेक युजर आयडी बनवून त्याच्या मदतीने एक गेम लॉन्च केला. या गेममध्ये हिंदू मुलांना कलमा वाचण्यासाठी तयार करून इस्लाम कबूल करण्यास भाग पाडत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मुंबई : मोबाईल गेम धर्मांतर प्रकरणी पोलिसांनी आरोपी शाहनवाझ मकसूदला अटक केली आहे. ठाणे आणि गाझियाबाद पोलीसांनी संयुक्त कारवाई करत रायगड जिल्ह्यातून शाहनवाझला अटक केली. मुंब्र्यातील आरोपी शाहनवाज खान याने फेक युजर आयडी बनवून त्याच्या मदतीने एक गेम लॉन्च केला. या गेममध्ये हिंदू मुलांना कलमा वाचण्यासाठी तयार करून इस्लाम कबूल करण्यास भाग पाडत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर ‘गाझियाबाद मधील एक अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार 400 हिंदूंचे धर्मांतर झालं आहे. त्यावरून सध्या चांगलेच राजकारण तापलेलं आहे. याचदरम्यान शाहनवाझच्या अटकेवर मुंब्र्यात वातावरण तापलेलं आहे. यावरून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुंब्र्यातील तरुणांचं भवितव्य धोक्यात असून 400 जणांचं धर्मांतर झालंय, त्या मुलांची नावं द्या, अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांकडे केली आहे. तर गेममध्ये मधून कधी धर्मांतर होऊ शकत का असा सवाल केला आहे. तर फक्त एक मुसलमान गावला की त्यांला टाका आत, तर मुसलमानांना बदनाम करायला लागतच काय असेही ते म्हणालेत. तर थेट ठाणे पोलीसांना अल्टीमेट देत 400 जणांचं धर्मांतर झालंय तर त्यांची नावं द्या अशी मागणी करण्यात आली आहे. जर पोलीसांनी ती दिली नाही तर मुंब्रा बंद करू असा इशारा दिला आहे.

Published on: Jun 12, 2023 09:00 AM