‘मणिपूरवरून लक्ष हटवण्यासाठीच भिडे यांचा वापर’; राष्ट्रवादी नेत्याचा सरकारवर हल्लाबोल
मणिपूर पेटत आहे. तर तेथे महिलांच्या नग्न धिंड काढल्या जात असून त्यांच्यावर अत्याचार केला गेल्याचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. यावरून देशातील राजकारण तापलेलं आहे. विरोधकांनी संसदेत यावरून गदारोळ केला. तर येथे महाराष्ट्रात देखील सध्या गदारोळ सुरू आहे.
ठाणे, 01 ऑगस्ट 2023 | गेल्या महिन्यापासून मणिपूरमध्ये हिंसाचार (Manipur Violence) सुरू आहे. मणिपूर पेटत आहे. तर तेथे महिलांच्या नग्न धिंड काढल्या जात असून त्यांच्यावर अत्याचार केला गेल्याचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. यावरून देशातील राजकारण तापलेलं आहे. विरोधकांनी संसदेत यावरून गदारोळ केला. तर येथे महाराष्ट्रात देखील सध्या गदारोळ सुरू आहे. येथे शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी अमरावतीत महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. या वक्तव्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झालेले पाहायला मिळाले आहे. तर राज्यभर आंदोलने केली जात आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी भिडेंच्या विरोधात जोरदार टीका करताना सरकारवर हल्लाबोल केला आहे. आव्हाड यांनी, मणिपूर प्रकरणावरून लक्ष हटविण्यासाठीच सरकारकडून भिडेंचा वापर केला जात असल्याचा आरोप केला आहे. तर महाराष्ट्रात मणिपूरच्या घटनेवरून अवस्थता पसरत होती. त्यामुळे सरकारला भीती वाटत असल्यानेच भिंडेचं ते वक्तव्य होतं. संभाजी भिंडे शासन पुस्कृत दलाल असल्याचा घणाघात यावेळी आव्हाड यांनी केला. याचबरोबर आव्हाड यांनी आणखीन काय टीका केली आहे. ते पाहा या व्हिडिओत…