मोठा वाद आणि पत्रकाराला मारहाणीनंतर आमदार किशोर पाटील म्हणतात, ‘माझ्यासाठी आता संदीप महाजन...’

मोठा वाद आणि पत्रकाराला मारहाणीनंतर आमदार किशोर पाटील म्हणतात, ‘माझ्यासाठी आता संदीप महाजन…’

| Updated on: Aug 12, 2023 | 2:19 PM

आमदार किशोर पाटील यांनी चिथावणी दिल्यानेच त्यांच्या समर्थकांनी महाजन यांना मारहाण केल्याचा आरोप विविध पत्रकार संघटनांनी केला आहे. तसेच पाटील व मारहाण करणाऱ्या समर्थकांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशा मागणी देखील पत्रकारांच्या वतीने करण्यात येत आहे.

बीड, 12 ऑगस्ट 2023 | पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर राज्यभर पत्रकार संघटना आता आक्रमक झाल्या आहेत. तर परळी तालुका व परळी पत्रकार संघाच्या वतीने देखील तीव्र निदर्शने करण्यात आली. तसेच आमदार किशोर पाटील यांनी चिथावणी दिल्यानेच त्यांच्या समर्थकांनी महाजन यांना मारहाण केल्याचा आरोप विविध पत्रकार संघटनांनी केला आहे. तसेच पाटील व मारहाण करणाऱ्या समर्थकांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशा मागणी देखील पत्रकारांच्या वतीने करण्यात येत आहे. याचदरम्यान पाचोर्‍यात शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांच्या समर्थनासाठी आणि पत्रकार संदीप महाजन यांचा निषेध म्हणून किशोर पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून निषेध मोर्चा काढला. तर यावरून आमदार किशोर पाटील यांनी मी दोन दिवसांपुर्वी याबाबत राज्यातीत तमाम जनतेला मीडियाच्या माध्यमातून माझी बाजू सांगितली आहे. त्यामुळे माझ्याकडून हा विषय येथेच संपल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

Published on: Aug 12, 2023 02:18 PM