नागरिकांकडून इर्शाळवाडीत मदतीचा वेग वाढला; पण शिवसेना नेत्या कायंदे म्हणतात, ‘आदिवासी लोक’
यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आणि बचावकार्याचा आढावा घेतला होता. तसेच त्यांनी आता इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्त मुलांचं पालकत्व स्वीकरणारं आहे, अशी माहिती नीलम गोऱ्हे यांनी दिली.
मुंबई | 22 जुलै 2023 : रायगडमध्ये मोठी दुर्घटना घडली असून इर्शाळवाडीत दरड कोसळून 24 जणांचा मृत्यू झाला. या ठिकाणी मदत आणि बचावकार्य आज चौथ्या दिवशी देखील सुरू आहे. यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आणि बचावकार्याचा आढावा घेतला होता. तसेच त्यांनी आता इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्त मुलांचं पालकत्व स्वीकरणारं आहे, अशी माहिती नीलम गोऱ्हे यांनी दिली. त्या इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्त मुलांचं सांत्वन करण्यासाठी नडाळा पंचायत मंदिरात असता ही माहिती दिली. याचदरम्यान इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांना आता मदतीचा वेग वाढला असून मदत मोठ्या प्रमाणात येत आहे. यावेळी शिंदे गटाच्या आमदार मनीषा कायंदे यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे. त्यांनी, मदत मोठ्या प्रमाणात येतेय. पण ती मदत देत असताना जास्त मॉडर्न स्वरूपाच अन्न देऊ नका असे म्हटलं आहे. तर यामागचे कारण सांगताना त्यांनी, दुर्घटनाग्रस्त हे आदिवासी लोक आहेत त्यांना डाळ भात नाचणीची भाकरी खाण्याची सवय असल्याचं म्हटलं आहे. तसेच तेथील मुलांचं पालकत्व हे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वीकारल्याचं त्यांनी देखील म्हटलं आहे.