आमदार प्रशांत बंग यांच्याकडून शिक्षकांना वंदन
शिक्षकांमुळे मुलांची वाट लागली, शिक्षकांना काय असते काम असा सवाल करणाऱ्या आमदार प्रशांत बंब यांनी आज मात्र शिक्षकांना वंदन करुन त्यांच्या कामाची दखल घेतली. शाळेच्या परिसरात राहणाऱ्या तीन ते चार शिक्षकांची भेट घेत त्यांना आमदार प्रशांत बंग यांनी वंदन केले.
शिक्षकांमुळे मुलांची वाट लागली, शिक्षकांना काय असते काम असा सवाल करणाऱ्या आमदार प्रशांत बंब यांनी आज मात्र शिक्षकांना वंदन करुन त्यांच्या कामाची दखल घेतली. शाळेच्या परिसरात राहणाऱ्या तीन ते चार शिक्षकांची भेट घेत त्यांना आमदार प्रशांत बंग यांनी वंदन केले. या परिसरात असणाऱ्या 27 शिक्षकांपैकी तीन शिक्षकांची भेट त्यांना वंदन करुन शिक्षकांबरोबर संवाद साधायचा प्रयत्न केला यावेळी त्यांनी शाळा, विद्यार्थी आणि शिक्षकांच्या समस्या काय आहेत याचीही चौकशी केली. काही शाळांना भेट देऊन त्यांनी झाडाझडती घेण्याचाही प्रयत्न केला. यावेळी मुलांचे अभ्यासात लक्ष आहे की नाही, शिक्षक त्यांना शिकवतात की नाही याचीही त्यांनी तपासणी केली. काही दिवसांपूर्वी आगपाखड करणाऱ्या शिक्षकांवर बंग यांनी आज मात्र प्रेमाचा वर्षावच केला आहे.
Latest Videos