TOP 9 News | शिंदे भाजप सरकार जुनी पेन्शन योजना लागू करण्याची शक्यता

| Updated on: Mar 13, 2023 | 10:28 AM

राज्यातील 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांना शिंदे भाजप सरकार जुनी पेन्शन योजना लागू करण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे

मुंबई : आमदार राहुल कुल यांच्या भीमा साखर कारखान्यामध्ये 500 कोटींचं मनी लॉन्ड्रीगचं प्रकरण. हे प्रकरण ईडी, सीबीआयकडे द्या अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली. यावेळी राऊत यांनी, आमदार राहुल कुल यांनी 2016 ते 2022 वर्षांमध्ये गळीत हंगाम बंद असताना खुल्या साखर साठ्याची परस्पर विक्री केली. ऊस तोडणी वाहतुकीसाठी घेतलेल्या कर्जातून गैरव्यवहार करत ते पैसे घरासाठी वापरल्याचा आरोप राऊत यांनी केला. तर राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ हे ईडीच्या चौकशीला हजर राहणार नाहीत. ते ईडीला उत्तर त्यांच्या वकिलांमार्फत देणार आहेत. जुन्या पेन्शन योजनेबाबत आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची मुख्य सचिवांच्या उपस्थितीत बैठक पार पडणार आहे. यानंतर राज्यातील 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांना शिंदे भाजप सरकार जुनी पेन्शन योजना लागू करण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

Published on: Mar 13, 2023 10:28 AM