‘अमरावतीची बांधणी म्हणजे राजकीय स्टंट’; रवी राणा यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका

‘अमरावतीची बांधणी म्हणजे राजकीय स्टंट’; रवी राणा यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका

| Updated on: Aug 22, 2023 | 3:05 PM

होऊ घातलेल्या लोकसभा निवडणूकांवरून भाजप आणि इतर सर्वच पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे. तर उद्धव ठाकरे यांनी देखील आपल्या गटाकडून पक्ष बांधणी आणि मतदार संघनिहाय काम सुरू केलं आहे.

अमरावती : 22 ऑगस्ट 2023 | येत्या काही महिन्यातच राज्यात लोकसभेच्या निवडणूकांच्या कार्यक्रम जाहिर होण्याची शक्यता आहे. त्याअनुशंगाने सर्वच पक्ष कामाला लागेल आहेत. तर अनेक पक्षांनी लोकसभा मतदार संघनिहाय चाचपणी देखील सुरू केली आहे. यात भाजप आघाडीवर असून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे लोकसभा मतदार संघनिहाय दौऱ्यावर आहेत. तर ठाकरे गटाकडून देखील आता मोर्चे बांधणी सुरू करण्यात आली आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपला मोर्चा अमरावतीकडे वळवला आहे. या मतदारसंघासाठी त्यांनी बैठक बोलावली आहे. त्यावरून आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. त्यांनी जशा निवडणुका जवळ येतात तसे सर्वच पक्ष हे मोर्चे बांधणीला लागतात. आम्ही तर १२ महिने हे काम करत असतो. पण आता ठाकरे बांधणी करत आहेत. ठाकरे यांनी अमरावती मतदार संघाची कितीही बांधणी केली तरी ते, मुख्यमंत्री असताना विदर्भाला काही देऊ शकले नाहीत. विदर्भाच्या जनतेला ते काही देऊ शकतले नाहीत. ते आता काय देतील असा सवाल केला आहे. तर त्यांची आताची जी बांधणी आहे ती फक्त राजकीय स्टंट आहे.

Published on: Aug 22, 2023 03:05 PM