सेनाभवन, उर्वरित आमदार आणि नगरसेवक लवकरच एकनाथ शिंदेंसोबत असतील; 'या' आमदाराचा दावा

सेनाभवन, उर्वरित आमदार आणि नगरसेवक लवकरच एकनाथ शिंदेंसोबत असतील; ‘या’ आमदाराचा दावा

| Updated on: Feb 18, 2023 | 1:28 PM

आमदार रवी राणा यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर भाष्य केलंय. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांची बाजू घेतली आहे. तर उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. पाहा...

अमरावती : आमदार रवी राणा यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर भाष्य केलंय. निवडणूक आयोगाचा निर्णय हा लोकशाहीला धरून आहे. या निर्णयातून सत्यमेव जयते हा संदेश दिला गेला आहे, असं रवी राणा म्हणाले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या मालमत्ताचे वारसदार उद्धव ठाकरे होऊ शकतात.पण त्यांच्या विचारांचे वारसदार हे एकनाथ शिंदेच आहेत. दादरमधील शिवसेना भवनही काही दिवसातच एकनाथ शिंदे यांच्याबरोबर दिसेल. पुढील पंधरा दिवसात उर्वरित आमदार नगरसेवक एकनाथ शिंदेसोबत दिसतील. उध्दव ठाकरे यांचा अहंकार चुर-चुर झाला आहे, असं रवी राणा म्हणालेत.

Published on: Feb 18, 2023 01:28 PM