अरविंद सावंत यांच्या टीकेला गंभीरतेने घेण्याची गरज नाही; रवी राणा

अरविंद सावंत यांच्या टीकेला गंभीरतेने घेण्याची गरज नाही; रवी राणा

| Updated on: Jan 10, 2023 | 4:02 PM

उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून मशाल यात्रा काढण्यात आली होती. त्यावेळी खासदार अरविंद सावंत यांनी रवी राणा यांच्यावर जातप्रमाण पत्रावरून टीका केली होती. त्या टीकेला रवी राणा यांनी पलटवार केला आहे.

मुंबई : राज्यात झालेल्या सत्तासंघर्षानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेना आणि त्यांच्या गटाविरोधात अनेक जणांनी शड्डू ठोकला. भाजपने एकनाथ शिंदे यांच्या गटाला सोबत घेत राज्यात सत्ता आणली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले. यानंतर भाजप, शिंदे गट आणि भाजपप्रणीत मीत्र पक्षांनी उद्धव ठाकरे गटावर टीका करण्यास सुरूवात केली. यात अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) हे आघाडीवर होते. यावेळी आमदार रवी राणा यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर टीका केली आहे.

उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून मशाल यात्रा काढण्यात आली होती. त्यावेळी खासदार अरविंद सावंत (MP Arvind Sawant) यांनी रवी राणा यांच्यावर जातप्रमाण पत्रावरून टीका केली होती. त्या टीकेला रवी राणा यांनी पलटवार केला आहे. त्याचबरोबर शिवेसेनेबाबात मोठा दावा देखील केला आहे.

यावेळी रवी म्हणाले, अरविंद सावंत यांनी काल जो मोठा पराक्रम केला त्यावेळी मोजून ३५ ते ४० लोक होते. या मूठभर लोकांच्या समोर एका खासदाराने बोलावं अशी त्यांची गत झाली आहे. अरविंद सावंत यांच्या टीकेला गंभीरतेने घेण्याची गरज नाही.

Published on: Jan 10, 2023 04:02 PM