नव्या जाहिरातीवर राष्ट्रवादी नेत्याची खोचक प्रतिक्रिया; म्हणाला, फडणवीस यांच्या ‘मनाला इजा…’
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचेही फोटो वापरण्यात आले आहेत. तर राज्यात शिंदे फडणवीस-सरकारनं काय काम केलं हे सांगण्यात आलं आहे. यावरूनही विरोधकांनी शिंदे गटावर हल्लाचढवला आहे. याचमद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी देखील टीका केली आहे.
अहमदनगर : काल दिलेल्या जाहिरीतीवरून राज्यात चांगलाच गदारोळ उठल्यानंतर आता शिंदे गटाकडून नवी जाहिरात देण्यात आली आहे. ज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचेही फोटो वापरण्यात आले आहेत. तर राज्यात शिंदे फडणवीस-सरकारनं काय काम केलं हे सांगण्यात आलं आहे. यावरूनही विरोधकांनी शिंदे गटावर हल्लाचढवला आहे. याचमद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी देखील टीका केली आहे. त्यांनी, फडणवीस यांच्या ‘कानाला’ इजा झालेली नव्हती. तर ‘मनाला’ झालेली होती. मनाला झालेली इजा परवडणार नसल्यानेच आज पुन्हा नवीन जाहिरात दिली असावी, असा घणाघात ट्विट करत म्हटलं आहे. तर सरकारनं कामं केली असती तर आज जाहिरातीतून असे ढोल वाजवण्याची वेळच आली नसती. त्यातही जाहिरातीच्या मांडणीवरूनच इतका गोंधळ असेल तर सरकार चालवताना किती असेल? यामुळंच राज्यात गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय. सरकार केवळ जाहिरातीतच दिसतय. त्यांच्या जाहिरातीच पाहत बसायचं का? असा सवालही रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.