‘विधानसभा अध्यक्ष निर्णय ढकलण्याचं काम करतायेत’; ठाकरे गटाच्या नेत्याचा आरोप
शिवसेना ठाकरे गटाकडून १६ आमदारांच्या अपात्रतवरून न्यायावलयात धाव घेण्यात आली. त्यावर न्यायालयाने निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले तर याबाबत निर्णय योग्य कालावधीत घ्यावा अशा सुचना केल्या होत्या.
मुंबई, 03 ऑगस्ट 2023 | शिवसेनेत फुट पडल्यानंतर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट असे दोन गट तयार झाले. तर शिंदे यांच्याबरोबर अनेक आमदार गेल्याने मविआचे सरकार पडले. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाकडून १६ आमदारांच्या अपात्रतवरून न्यायावलयात धाव घेण्यात आली. त्यावर न्यायालयाने निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले तर याबाबत निर्णय योग्य कालावधीत घ्यावा अशा सुचना केल्या होत्या. मात्र त्यावर अजूनही निर्णय झालेला नाही. उलट शिंदे गटातील आमदारांनी आपलं म्हणणं मांडण्यासाठी मुदत वाढ मागितली. यावरून ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी सरकारसह विधान सभा अध्यक्षांवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी 18 सप्टेंबरला दोन्ही प्रकरण क्लब करण्यात आली होती. त्यामुळे ते प्रकरण लांब गेल्याचं वाटत नाही. तर १६ आमदारांच्या अपात्रतेवरून अध्यक्ष निर्णय घेत नसल्यानेच पुन्हा एकदा न्यायालयात जाव लागल्याचे राज्यानं पाहिलं आहे. मात्र विधानसभा अध्यक्षानी अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे महापालिका निवडणूका या पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला जातोय असे दिसत आहे असे देखील अहिर यांनी म्हटलं आहे.