आमदार संजय गायकवाड बरसले, संजय राऊत यांच्यावर घसरले, मुंबईचा दाखला देत केली अशी टीका

आमदार संजय गायकवाड बरसले, संजय राऊत यांच्यावर घसरले, मुंबईचा दाखला देत केली अशी टीका

| Updated on: Aug 30, 2023 | 9:57 PM

खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लाचार आणि गुडघे टेकणारा मुख्यमंत्री अशी टीका केली होती. त्यावरून शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी संजय राऊत यांना खडे बोल सुनावले आहेत.

बुलढाणा : 30 ऑगस्ट 2023 | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लाचार आणि गुडघे टेकणारे म्हणणारा संजय राऊत याला लाज वाटायला पाहिजे. मुख्यमंत्री शिंदे यांनी जी क्रांती केली, उठाव केला. त्यामुळे त्यांचे नेतृत्व कसे हे महाराष्ट्राने पाहिले आहे. एक स्वाभिमानी नेतृत्व राज्य कसे सांभाळू शकते. ५० आमदार घेऊन कशाप्रकारे क्रांती करू शकते ही चमक मुख्यमंत्री शिंदे यांनी दाखवली आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीका करणाऱ्यांनी आपले तोंड आरशात बघावं आणि मग टीका करावी. मुंबई हा महाराष्ट्राचा मुकुटमणी आहे. हा मुकुटमणी चमकण्याकरता एकनाथ शिंदे प्रचंड प्रमाणामध्ये मेहनत घेऊन काम करत आहेत. हा मुकुटमणी कायम महाराष्ट्रातच रहाणार आहे. त्याच घास कुणी घेणार नाही. उलट ज्याच्या ताब्यात वीस वर्ष मुंबई महापालिका होती त्यांनीच मुंबईचा घास घेतला आहे. तिचा सत्यनाश केला, वाटोळे केले. मुंबईकरांचे जे त्यांनी हाल केले आहेत त्यामुळे त्यांना टिका करण्याचा काही अधिकार राहत नाही असा पलटवार करत शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली.

Published on: Aug 30, 2023 09:57 PM