अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ का सोडली? शिवसेना नेता म्हणतो, ‘अजितदादा वरचढ ठरत...’

अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ का सोडली? शिवसेना नेता म्हणतो, ‘अजितदादा वरचढ ठरत…’

| Updated on: Jul 17, 2023 | 8:44 AM

अजित पवार यांनी बंडखोरी करत राष्ट्रवादीतील ३० हून आमदार आपल्याबरोबर घेत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामिल झाले आहेत. त्यांच्या या बंडामागे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडून वेळोवेळो देण्यात येणाऱ्या दुजाभाव असल्याचं बोललं जात आहे.

बुलढाणा, 17 जुलै 2023 | गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार उलथापालथ झाली आहे. अजित पवार यांनी बंडखोरी करत राष्ट्रवादीतील ३० हून आमदार आपल्याबरोबर घेत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामिल झाले आहेत. त्यांच्या या बंडामागे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडून वेळोवेळो देण्यात येणाऱ्या दुजाभाव असल्याचं बोललं जात आहे. तर त्यांना पक्षात हवं असलेलं पद देण्यात न आल्यानेच त्यांनी ही बंडखोरी केली असंही बोललं जात आहे. यावरूनच त्यांनी २०१९ मध्ये पहाटेचा शपथविधी घडवून आणला असे बोलले जात आहे. तर मध्यंतरी पुन्हा अशीच स्थिती झाल्यानेच शरद पवार यांनी राजीनामानाट्य रचल्याची जोरदार चर्चा राज्यात रंगली होती. त्यावरूनच शिंदे गटाचे नेते आमदार संजय गायकवाड यांनी आरोप केला आहे. यावेळी गायकवाड यांनी अजित पवारांना आणि एकनाथ शिंदें यांचे राजकारण संपविण्याचे प्रयत्न आपल्याच परिसरातून झाले. तर अजित पवारांमध्ये चांगले गुण असल्याने शरद पवारांनी त्यांना खासदार बनवून दिल्लीला पाठवलं होत. तर अजितदादा वरचढ ठरत असल्याने शरद पवारांनी राजीनाम्याचा ड्रामा खेळला होता. मात्र त्याचा काहीही फायदा झाला नाही. अजित पवारांना हवं असलेलं प्रदेशाध्यक्ष पद देखील देण्यात आलं नाही असंही त्यांनी म्हटलं आहे.

 

Published on: Jul 17, 2023 08:44 AM