‘आता दुकान बंद झालं’; शिवसेना नेते संजय गायकवाड यांची ठाकरे गटावर टीका
शिंदे गटाचे काही आमदार हे आपल्या संपर्कात असल्याचे सांगत ते ठाकरे गटात येण्यासाठी निरोप पाठवत असल्याचा गौप्यस्फोट केला होता. त्यानंतर राज्याच्या राजकारण एकच खळबळ उडाली होती.
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटातील नेत्यांवर टीका केली होती. तसेच शिंदे गटाचे काही आमदार हे आपल्या संपर्कात असल्याचे सांगत ते ठाकरे गटात येण्यासाठी निरोप पाठवत असल्याचा गौप्यस्फोट केला होता. त्यानंतर राज्याच्या राजकारण एकच खळबळ उडाली होती. त्यावरून शिंदे गटाचे नेते आमदार संजय गायकवाड यांनी आदित्य ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीवर टीका केली आहे. त्यांनी यावेळी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना, आमच्याकडचे कोणीच त्यांच्या संपर्कात नाहीत. उलट 10 ते 15 आमदार आमच्या संपर्कात आहेत. तर आमच्या लोकांचे परतीचे दोर कापून टाकलेले आहेत. त्यांनी आमच्याकडून अपेक्षा का करावी. कारण, आमच्या बायका सोडून जातील, आमचे मुडदे पडतील, लोक गाडतील असे हे म्हणाले होते. त्यामुळे एवढे बोलल्यावर परतीचे अपेक्षा कशाला ठेवता असा सवाल त्यांनी केली आहे. तसेच त्यांचे दुकान आता बंद झाले आहे. तर निवडणूका यायच्या आतच महाविकास आघाडीचा बाजार उठला आहे. तर अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे राज्यात पुन्हा सत्ता आणतील आणि त्यांची धुळधाण होईल असेही गायकवाड यांनी म्हटलं आहे.