‘…त्याचं नाव तोंडावर घेण आवडत नाही’; शिंदे गटाच्या नेत्याची संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही टोला लगावला होता. त्यावरून फडणवीसांनी पलटवार केला होता. फडणवीसांनी आरोग्य शिबिरात सर्वसामान्य रुग्णांची तपासणी होते. तशी टीव्हीवर बोलणाऱ्यांची तपासणी करा. त्यांना मानसोपचार तज्ज्ञांची गरज आहे की, पागालखण्यात ठेवाचे याचे निदान होईल.
औरंगाबाद, 14 ऑगस्ट 2023 | ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अविश्वास प्रस्तावाच्या भाषणावरून जोरदार टीका केली. राऊत यांनी सामनातील रोखठोक या सदरातून मोदींवर टीका केली होती. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही टोला लगावला होता. त्यावरून फडणवीसांनी पलटवार केला होता. फडणवीसांनी आरोग्य शिबिरात सर्वसामान्य रुग्णांची तपासणी होते. तशी टीव्हीवर बोलणाऱ्यांची तपासणी करा. त्यांना मानसोपचार तज्ज्ञांची गरज आहे की, पागालखण्यात ठेवाचे याचे निदान होईल. त्यानंतरच गिरीश भाऊ तुम्ही आरोग्यदूत म्हणून यशस्वी व्हाल, अशी मिश्किल टीका राऊत यांच्यावर केली होती. तर अशीच टीका शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी देखील केली आहे. यावेळी शिरसाट यांनी, मीही अनेक वेळा सांगतो, आम्हाला सुद्धा संजय राऊतचे नाव तोंडावर घेण आवडत नाही. परंतु आज फडणवीस यांनी देखील त्यावर शिक्कामोर्तब करून राऊत यांना मानसोपचाराची गरज असल्याचं म्हटलं आहे. परंतू ते ठाकरे हे ऐकणार नाहीत. कारण राऊतांनी काय बंगाली जादू केली माहिती नाही. पण त्यांना खरंच मानसोपचाराची गरज आहे.