महामंडळा वाटपाचा फार्म्युला ठरल्याच्या बातम्या टेबल न्यूज? शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं वक्तव्य, म्हणाला, ‘फॉर्म्युला’
महामंडळे आणि विविध शासकीय समित्यांवरील नियुक्तीचा फॉर्म्युला ठरल्याच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे आता महामंडळे आणि विविध शासकीय समित्यांवरील नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे
मुंबई, 14 ऑगस्ट 2023 | गेल्या दोन एक दिवसांपासून शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा महामंडळे आणि विविध शासकीय समित्यांवरील नियुक्तीचा फॉर्म्युला ठरल्याच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे आता महामंडळे आणि विविध शासकीय समित्यांवरील नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. तर यामुळे भाजप, शिंदे गटासह अजित पवार गटातील अनेक नाराजांची नाराजी दुर करण्याचा प्रयत्न यातून होणार आहे. तर ५०-२५-२५ असा महामंडळे वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. मात्र याच दरम्यान याबाबत शिंदे गटाकडून या बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचे म्हटलं जात आहे. शिंदे गटाचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी यावरूनच प्रतिक्रिया देताना, असा कोणताच फॉर्म्युला ठरला नसल्याचे सांगत, या बातम्या या टेबल न्यूज आहेत असे म्हटलं आहे. तसेच महामंडळे वाटपाबाबत तिन्ही भाजपष शिंदे आणि अजित पवार गटातून नेमलेली समिती यावर निर्णय घेईल असे देखील स्पष्टीकरण शिरसाट यांनी दिलं आहे.