कोणत्याही कारणामुळे मी नाराज नाहीः आमदार शिरसाठ
संजय शिरसाठ नाराज असल्याच्या बातमीमुळे राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा झाली होती, मात्र आताही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करुनही त्यांच्याच गटातील आमदार नसल्याने पुन्हा एकदा शिरसाठ आणि त्यांची नाराजगी चर्चेत आली आहे.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर शिंदे आणि भाजप गटातील आमदारांसाठी स्नेहभोजणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. या कार्यक्रमाला शिंदे-भाजप गटातील सर्व आमदारांकडून उपस्थिती लावण्यात येत असली तरी आमदार संजय शिरसाठ मात्र या कार्यक्रमाला उपस्थितीत राहू शकणार नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला संजय शिरसाठ उपस्थिती राहत नसल्याने राजकीय चर्चेला उधान आले आहे. संजय शिरसाठ नाराज असल्याची बातमीही गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेली जात आहे. मंत्रिमंडळचा विस्तार झाल्यानंतरही संजय शिरसाठ नाराज असल्याच्या बातमीमुळे राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा झाली होती, मात्र आताही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करुनही त्यांच्याच गटातील आमदार नसल्याने पुन्हा एकदा शिरसाठ आणि त्यांची नाराजगी चर्चेत आली आहे.