नजरेत सदा नवी दिशा असावी ; काल कविता ट्विट केली, अन् आज स्पष्टीकरण; म्हणाले...

नजरेत सदा नवी दिशा असावी ; काल कविता ट्विट केली, अन् आज स्पष्टीकरण; म्हणाले…

| Updated on: Feb 15, 2023 | 1:48 PM

नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे सध्या आभार दौरा करत आहेत. निवडणुकीत यश मिळाल्यानंतर नाशिक विभागात ते दौरा करत आहेत. पाहा...

कोपरगाव, अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे सध्या आभार दौरा करत आहेत. निवडणुकीत यश मिळाल्यानंतर नाशिक विभागात ते दौरा करत आहेत. यावेळी त्यांनी कालच्या ट्विटवर स्पष्टीकरण दिलं. “माझ्या कालच्या ट्विटचा वेगळा अर्थ काढण्याच कारण नाही. सह्याद्री शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात गेलो होतो. तिथे एका विद्यार्थ्यांने ती कविता सादर केली होती.आवडल्याने ती कविता ट्विट केली. माझ्या कालच्या ट्विटचा वेगळा अर्थ काढण्यात आला, असं सत्यजित तांबे म्हणालेत. आज अहमदनगर जिल्हयातील कोपरगाव आणि राहाता इथे सत्यजित तांबे आहेत. कोपरगाव येथील एसएसजीएम कॉलेजमध्ये जात त्यांनी शिक्षक , प्राध्यापकांचे आभार मानलेत.

Published on: Feb 15, 2023 01:48 PM