Vinayak Raut on Shahajibapu Patil | ‘विनोद जमतो मात्र मतदारसंघात विकास करु शकत नाही’-tv9
खासदार राऊत यांनी शहाजीबापूंवर टीका करताना, त्यांना विनोद जमतो मात्र मतदारसंघात विकास करु शकत नाही, असं म्हटलं आहे.
राज्याच्या सत्ता संघर्षात सगळ्यात जास्त गाजलेलं वाक्य म्हणजे काय झाडी, काय डोंगर, काय हाटेल… सगळ एकदम ओकेच… हे वाक्य आमदार शहाजीबापू पाटील यांचं. या वाक्यानं शहाजीबापू राज्यासह देशातही चांगलेच प्रसिद्धीस आले. मात्र आता त्यांच्यावर खासदार विनायक राऊत यांनी टीकेची तोफ डागली आहे. खासदार राऊत यांनी शहाजीबापूंवर टीका करताना, त्यांना विनोद जमतो मात्र मतदारसंघात विकास करु शकत नाही, असं म्हटलं आहे. त्याचबरोबर राऊत म्हणाले, शहाजी बापू सारखा माणूस राजकारणात नौटंकी करू शकतो. ते आपल्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करू शकत नाही. तर सध्या याबाबत त्यांच्याच मतदारसंघातील मतदारच बोलत आहेत. तसेच त्यांच्या मतदारसंघातील विद्यार्थी म्हणतात नॉट ओके…
Latest Videos