साताऱ्यात पालकमंत्री आणि उदयनराजे यांच्यात ‘इगो वॉर’? शिवेंद्रराजे भोसले म्हणतात, ‘राजेंशी बोलण्यात काही अर्थच’
एकाने भिंतीवर चित्र काढलं. तर दुसऱ्या नेत्याने येथील पोवई नाक्यावर आयलँड उभारण्याचे काम हाती घेतले आहे. हा प्रकार म्हणजे दोन्ही नेत्यांचा इगो आहे. या इगोमध्ये सातारकर आणि शिवभक्त गुंतून पडले आहेत. या इगो चा फटका सातारकरांना बसला आहे.
सातारा : शहरात सध्या पालकमंत्री आणि उदयनराजे भोसले यांच्यात सध्या जोरदार राजकारण सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. येथे पालकमंत्री शंभूराजे देसाई आणि उदयनराजे यांच्यात ‘इगो वॉर’ पहायला मिळत आहे. ज्याचा फटका साताऱ्याला बसत असल्याचे मत आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केलं आहे. यावेळी त्यांनी, एकाने भिंतीवर चित्र काढलं. तर दुसऱ्या नेत्याने येथील पोवई नाक्यावर आयलँड उभारण्याचे काम हाती घेतले आहे. हा प्रकार म्हणजे दोन्ही नेत्यांचा इगो आहे. या इगोमध्ये सातारकर आणि शिवभक्त गुंतून पडले आहेत. या इगो चा फटका सातारकरांना बसला आहे. या प्रकरणासंदर्भात खासदार उदयनराजे भोसले सामंजस्याची भूमिका घेतील असे वाटत नाही. उदयनराजेंशी बोलण्यात काही अर्थच नाही उदयनराजे हे स्वतःच्याच विश्वात सतत असल्यामुळे त्यांच्याकडून भूमिका घेतली जाईल अस वाटत नसल्याचं म्हणत खिल्ली उडवली आहे. तर पालकमंत्री देसाई यांनीच या प्रकरणी सामंजस्याची भूमिका घ्यावी. त्यांनीच सामंजसपणा दाखवून शिवभक्तांचा भावनेचा विचार करून हे स्मारक पोवई नाका येथे न करता दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी करावे, असही त्यांनी म्हटलं आहे.