सुरत – गुवाहाटी – गोवा भ्रमण करून आता बंडखोर आमदार श्रीनिवास वनगा रमले शेतीच्या कामात
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शपथविधी झाल्यावर किमान पंढरवड्या नंतर सर्व आमदार आपापल्या घरी परतलेले आहेत . पालघर मध्ये सध्या भात रोपणीची काम सुरू असून आपल्या साधेपणा मुळे नेहमी चर्चेत असलेले पालघर विधानसभेचे आमदार श्रीनिवास वणगा यांनी स्वतः आपल्या शेतात उतरत रोपणीला सुरुवात केली यावेळी त्यांच्या सोबत त्यांच्या आई देखील रोपणीच्या कामात वणगा यांना मदत करताना दिसून आल्या .
सुरत – गुवाहाटी – गोवा भ्रमण करून सरकार स्थापन झाल्यावर बंडखोर शिंदे गटाचे पालघर विधानसभेचे आमदार श्रीनिवास वणगा(MLA Srinivasa Vanaga) यांनी आपल्या घरी आल्यावर शेतात उतरत थेट भात रोपणीला सुरुवात केली आहे(agricultural work) . महाराष्ट्रात गेल्या बारा-तेरा दिवस राजकीय नाट्य सुरू होतं . यामध्ये एकनाथ शिंदे गटातील आमदार सुरत गुवाहाटी गोवा त्यानंतर मुंबईत परतले .
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शपथविधी झाल्यावर किमान पंढरवड्या नंतर सर्व आमदार आपापल्या घरी परतलेले आहेत . पालघर मध्ये सध्या भात रोपणीची काम सुरू असून आपल्या साधेपणा मुळे नेहमी चर्चेत असलेले पालघर विधानसभेचे आमदार श्रीनिवास वणगा यांनी स्वतः आपल्या शेतात उतरत रोपणीला सुरुवात केली यावेळी त्यांच्या सोबत त्यांच्या आई देखील रोपणीच्या कामात वणगा यांना मदत करताना दिसून आल्या .
आम्ही कोणतही बंड केलं नसून जो अन्याय होत होता त्याबाबत उठाव केला. जरी मुख्यमंत्री उद्घवजी होते तरी देखील सर्व कामकाज राष्ट्रवादी चालवत होती त्यामुळे सर्वच आमदार नाराज होते त्यामुळे आम्हाला हे करावं लागल असल्याचं वणगा यांच्या कडून सांगण्यात आलं . तर जो आदर उद्धवजिंच्या बाबत होता तो आजही आहे आम्हाला मिळेल त्यात आम्ही समाधानी आहोत. असंही वणगा यावेळी म्हणाले
Published on: Jul 06, 2022 11:03 PM
Latest Videos