Maharashtra Political News : 16 आमदारांचा मुद्दा पुन्हा सर्वोच्च न्यायालयात; नार्वेकर यांच्या अडचणी वाढणार? न्यायालयात ठाकरे गटाची याचिका
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत ज्याप्रमाणे दुफळी माजली तशीच स्थिती आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झाली आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री होत राष्ट्रवादी काँग्रेसवर आपला हक्क सांगितला आहे. त्यामुळे राज्यातील राजकारणाला वेगळीच दिशा मिळाली आहे.
नवी दिल्ली : राज्यात पुन्हा एकदा सत्तासंघर्षाची पुनरावृत्ती होते की काय अशी स्थिती उद्धवभली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत ज्याप्रमाणे दुफळी माजली तशीच स्थिती आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झाली आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री होत राष्ट्रवादी काँग्रेसवर आपला हक्क सांगितला आहे. त्यामुळे राज्यातील राजकारणाला वेगळीच दिशा मिळाली आहे. याचदरम्यान आता उद्धव ठाकरे गटाकडून शिंदे गटासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोडींत अडविण्याची तयारी सुरू झाली असून ठाकरे गटाने पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. ठाकरे गटाकडून आमदार सुनील प्रभू यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या निलंबनाबाबत दाखल असलेल्या याचिकांवर लवकर निर्णय घेण्याची मागणी केली आहे. त्यामुळे शिंदे गटातील आमदारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर अडचण उभारण्याची शक्यता आहे. तर प्रभू यांच्या या याचिकेवर सुप्रीम कोर्टात लवकरच सुनावणी होणार आहे.