Suresh Dhas : वाल्मिक कराड, सुदर्शन घुलेला मारहाणीच्या प्रकरणानंतर सुरेश धस यांची मोठी मागणी, म्हणाले त्यांना,…
Walmik Karad - Sudarshan Ghule News : सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड याला झालेल्या मारहाणीवर आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी देखील आता प्रतिक्रिया देत कारागृहात घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला आहे.
बीडच्या कारागृहात सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड याला झालेल्या मारहाणीवर आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी देखील आता प्रतिक्रिया दिली आहे. मारहाण करणारा महादेव गीते याला कराडने खोट्या गुन्ह्यात फसवलं आहे, त्यासंदर्भात एक व्हिडिओ देखील गीते याने तुरुंगात जाण्यापूर्वी बनवला होता. त्यानंतर त्याच वादातून ही मारहाण झाली असण्याचा अंदाज यावेळी आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केला आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले याला महादेव गीते आणि त्याच्या साथीदारांनी मारहाण केली आहे. गेल्या आठ दिवसांपासून त्यांचा वाद सुरू होता. त्यानंतर आज ही मारहाण झाली आहे. त्यावर आता आमदार सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘इतरांना खोट्या गुन्ह्यात अडकवायचं, फसवणूक करायची अशीच कामं कराड करत होता. महादेव गीते याला देखील एका खोट्या गुन्ह्यात अडकवलं आहे. त्याचा एक व्हिडिओ महादेव गीतेने जेलमध्ये जाण्यापूर्वी तयार केला होता. त्यातूनच हे झालं असेल. साधं काही मारामारी झाली असेल. वाल्मिक कराड हा ज्याला आपला शत्रू म्हणतो ते बबन गीते आहेत. आणि त्यांचाच समर्थक हा महादेव गीते आहे.

ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर राऊत स्पष्टच बोलले

शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंची बॅनरबाजी

हातात हात ओठांवर हसू... ठाकरे गटाकडून राज-उद्धव यांचा 'तो' फोटो ट्वीट

मला नाही वाटत..., राज-उद्धव एकत्र येण्यावरून सामंतांचा ठाकरेंवर निशाणा
