राऊत यांच्यानंतर काँग्रेसच्या बड्या नेत्याचंही पवार यांना आवाहन, म्हणाला, ‘पुन्हा एकदा विचार करावा…’
विरोधकांन केंद्र सरकार आणि भाजपवर टीका केली होती. याचदरम्यान यावरून संसदेत काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चर्चेला यावं यासाठी जोरदार प्रदर्शन केलं होतं. तर आंदोलन देखील करण्यात आलं होतं. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्याच्या दौऱ्यावर आहेत.
मुंबई, 31 जुलै 2023 | गेल्या काही दिवसापासून मणिपूरमध्ये हिंसाचार भडकला आहे. तर तेथे महिलेची नग्न धिंड काढून अत्याचार केलेला व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावर विरोधकांन केंद्र सरकार आणि भाजपवर टीका केली होती. याचदरम्यान यावरून संसदेत काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चर्चेला यावं यासाठी जोरदार प्रदर्शन केलं होतं. तर आंदोलन देखील करण्यात आलं होतं. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांना लोकमान्य टिळक पुरस्कार देण्यात येणार आहे. तर यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हजर राहणार आहेत. त्यावरून आता काँग्रेसमध्ये नाराजी दिसत आहे. याच्याआधी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता शरद पवार यांनी या कार्यक्रमाला जाणं टाळावं, असं आवाहन केलं होतं. त्यांच्यानंतर आता काँग्रेसच्या मुंबईच्या अध्यक्षा आमदार वर्षा गायकवाड यांनी देखी असंच वक्तव्य करताना पवार यांना आवाहन केलं आहे. पाहा काय आवाहन केलं आहे वर्षा गायकवाड यांनी…