Ajit Pawar | भाजपला एक न्याय, आम्हाळा वेगळा न्याय : अजित पवार-TV9
तर लोकशाहीमध्ये महत्त्वाच्या पदावर बसणाऱ्या व्यक्तीने एकाला एक नाही आणि दुसऱ्याला एक न्याय असं करून चालणार नाही असा टोलाही राज्यपालांना लगावला.
मुंबई : राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीवरून राज्यात पुन्हा एकदा राज्यपाल भगतसिंग कोश्यारीआणि मविआमधील आमने सामने येण्याची चिन्हं दिसत आहे. भाजपने नवी यादी दिल्यानंतर आता त्यावर राज्यपाल लगेच निर्णय घेतील असा टोला अमोल मिटकरी यांनी केला होता. त्यानंतर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखिल राज्यपालांवर यावरून निशाणा साधला आहे. यावेळी राज्यपालांच्या या भूमिकेवर बोलताना अजित दादा पवार म्हणाले राज्यपालांनी आमच्या यादीकडे दुर्लक्ष केलं. त्यांनी भाजपला एक न्याय आम्हाला दुसरा न्याय असं केल्याची टीका त्यांनी केली. तसेच राज्यपालांनी महाविकास आघाडी सरकारने दिलेल्या बारा आमदारांच्या नियुक्ती यादी कडे का दुर्लक्ष केलं याचा विचार आता राज्यातील जनतेने करावं असंही म्हटलं आहे. तर लोकशाहीमध्ये महत्त्वाच्या पदावर बसणाऱ्या व्यक्तीने एकाला एक नाही आणि दुसऱ्याला एक न्याय असं करून चालणार नाही असा टोलाही राज्यपालांना लगावला.