गेले, शपथ घेतली, मंत्री ही झाले मग अडचण काय? शरद पवार यांच्याकडे कसली करतायत याचणा?

गेले, शपथ घेतली, मंत्री ही झाले मग अडचण काय? शरद पवार यांच्याकडे कसली करतायत याचणा?

| Updated on: Jul 03, 2023 | 12:55 PM

आधी 2019 मध्ये पहाटेचा शपथ विधी तर आता 2023 चा दुपारचा शपथ विधी. 2019 चा जनता झोपेतच असतानाच तो झाल्यानं कोणालाच काहीच कळालं नव्हतं. तर 2023 मध्ये भर दुपारी सगळी जनती शुद्धीवर असताना हा शपथ विधी झाल्याने जनताच गारद झाली.

मुंबई : राज्याचे राजकारण गेल्या तीन एक वर्षात मोठ्या तीन एक भूकंपांना समोरं गेलं आहे. ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर राजकीय उलथापालथ झाली. यातील दोन तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीच घडवून आणले आहेत. आधी 2019 मध्ये पहाटेचा शपथ विधी तर आता 2023 चा दुपारचा शपथ विधी. 2019 चा जनता झोपेतच असतानाच तो झाल्यानं कोणालाच काहीच कळालं नव्हतं. तर 2023 मध्ये भर दुपारी सगळी जनती शुद्धीवर असताना हा शपथ विधी झाल्याने जनताच गारद झाली. त्यामुळे महाराष्ट्रात हा मोठा राजकीय भूकंप मानला जात आहे. याचदरम्यान आता अजित पवार यांनी थेट पक्षावरच दावा केला आहे. तर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या मंत्री झालेल्या 9 जणांवर कारवाई करावी अशी मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे. त्यामुळे आता या 9 जणांना काय करावे हेच सुचत नाही असे झाले आहे. जर कारवाई झालीच तर अख्ख राजकीय कारकिर्दच धोक्यात येणार आहे. त्यामुळे मंत्री झालेले आमदार आता शरद पवार यांच्या भेटीची वेळ मागत असल्याचे समोर आले आहे. तर अजित पवार यांच्याबरोबर छगन भुजबळ, दिलीपराव वळसे पाटील, हसन मुश्रिफ, धनंजय मुंडे, धर्मरावबाबा आत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील या आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्री पदाची शपथ घेतली आहे.

Published on: Jul 03, 2023 12:55 PM